श्रीरामाची आरती - ऐक बा रामराया...
ऐक बा रामराया , तुझ्या मी वंदितो पाया आवरी आपुली ही , विश्वमोहिनी माया ऐक बा रामराया ।।धृ।। मी मूढ हीनदीन , सर्व सक्रिया हिन तू क्षमाशील देवा शुद्धचरित निजधीन ऐक बा रामराया ।।१।। घडो सदा साधू संग , नसो विषय प्रसंग सप्रेम भक्ती द्यावी , सत्व वैराग्य अभंग ऐक बा रामराया ।।२।। वाटते नेते भावे तुझे साधू गुणगावे मन हे आवरेना सांग काय म्या करावे ऐक बा रामराया ।।३।। करिता संसार काम , मुखी असो तुझे नाम दया घना भक्त मोरयाचा पूरविसी काम ऐक बा रामराया ।।४।।